दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
खुटबाव, ता. ३ : नानगाव (ता. दौंड) येथे अष्टविनायक मार्गावर बुधवारी (ता. २) सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
या अपघातामध्ये सोहेल शाकीर पठाण (वय १६, रा. नानगाव, ता. दौंड) आणि अप्पा जनार्दन गिरे (वय ३३, रा. कोहकडी, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. कोहकडी हे नानगाव येथे पाहुण्याकडे आले होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकी व समोरून येणारी शालेय विद्यार्थ्यांची दुचाकी यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. वेगात असलेल्या दुचाकींची धडक होऊन दोन्हीही दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर आदळले. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे जनार्दन गिरे यांचा जागीच मृत्यू झाला. सोहेल पठाण याला बोरीपार्धी येथील निरामय दवाखान्यात मृत घोषित करण्यात आले. याशिवाय नीलेश शेलार व
सिद्धार्थ लोंढे (दोघेही रा. नानगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर काही वेळातच स्थानिकांनी धाव घेत पोलिसांना व रुग्णवाहिकेला कळवले. रुग्णवाहिका व स्थानिक वाहन याद्वारे अपघातग्रस्तांना तातडीने पुढील उपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठविण्यात आले. अपघातामध्ये दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अष्टविनायक मार्गाचे काम करताना स्थानिक ग्रामस्थांनी रुंदीकरणास विरोध केला होता. पुरेशा साईडपट्ट्या न झाल्याने अष्टविनायक मार्गावरील पारगाव- नानगाव रस्त्याचे काम अरुंद झाले आहे. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी चर्चा नानगाव ग्रामस्थांमध्ये झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.