धर्मदाय रुग्णालयांतील
दर निश्‍चित करा : कुल

धर्मदाय रुग्णालयांतील दर निश्‍चित करा : कुल

Published on

खुटबाव, ता. ४ : धर्मदाय रुग्णालयामध्ये खाटेचे व शस्त्रक्रियेचे दर निश्चित करणे गरजेचे आहे. अनेक रुग्णालयामध्ये ४८ तासांमध्ये पाच लाख रुपयांचा विमा संपतो, अशी उदाहरणे आहेत. सदर रुग्णालये उपचार काय करतात, हे समजत नाही, असा मुद्दा दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.
यावेळी कुल म्हणाले, ‘‘महात्मा फुले योजना धर्मादाय रुग्णालयांना बंधनकारक करावी. यामध्ये उपचारांचे दर कमी असून, ते वाढवणे गरजेचे आहे. तसेच, योजनेमध्ये औषधांचा समावेश करावा. याशिवाय रुग्ण सेवक व सोशल वर्कर त्वरित मदत देण्यासाठी आदेश द्यावेत. हे करताना हॉस्पिटलची बाजू लक्षात घेतली पाहिजे व रुग्णांनाही मदत झाली पाहिजे, असा विचार करणे गरजेचे आहे.’’
या मागणीवर आरोग्य राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सकारात्मक आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com