‘वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा तयार करा’

‘वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा तयार करा’

Published on

खुटबाव, ता. ६ : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पुणे शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

कोंडी सोडविण्यासाठी पावसाळी अधिवेशनातील सभागृहात सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेत आमदार कुल यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पुण्यासाठी अंतर्गत व बाह्य असे दोन रिंग रोड मंजूर करण्यात आले तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यान, तसेच पुणे अहिल्यानगर महामार्गावर पुणे ते शिरूर असे उन्नत मार्ग मंजूर करण्यात आले असून त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही, खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान सुमारे २२०० कोटी रुपये खर्चाचा भूमिगत कालवा मंजूर करण्यात आल्यामुळे कालव्याची जागा मोकळी होणार आहे. त्या जागेची किंमत सुमारे १५००० कोटी रुपये असून त्या जागेचा उपयोग करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने उपयोजना कराव्यात.

यावेळी उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, पुणे शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांचीही संख्या वाढत असून, प्रादेशिक परिवहन यांच्या अहवालानुसार पुण्यामध्ये एकूण ४० लाख ४२ हजार ६५९ इतकी वाहने रस्त्यावर धावत असतात. पुणे शहराची सन २०५४ पर्यंत होणारी वाढ लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत व सक्षम करण्यासाठी रिंगरोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो अशा पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा समावेश केला आहे. लोंगटर्म व शोर्टटर्म वाहतूक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असून, निधीसाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात ३० ठिकाणी मिसिंग लिंकचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यातील पाच ठिकाणी जिथे जास्त वाहतूक कोंडी होते त्याचे भूसंपादन करण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित कामे करण्यासाठी आवश्यक वॉर रूम महानगरपालिकेत उभारण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार सुनील कांबळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार विजय शिवतारे यांनी या लक्षवेधी वेळी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com