पारगावातील माळरानवर फुलवली दोडक्याची बाग
खुटबाव, ता.१७ : पारगाव (तालुका दौंड) येथील कृषी पदवीधर युवा शेतकरी मयूर मच्छिंद्र जेधे यांनी माळरान जमिनीवर २४ गुंठे क्षेत्रामध्ये ठिबक पद्धतीने दोडक्याचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. हिरवागार व कोवळा असणाऱ्या जेधे यांच्या दोडक्याला बाजारपेठेमध्ये मागणी आहे. त्यास १०० रुपये किलो प्रतिकिलो बाजारभाव मिळाला आहे.सध्या प्रतिकिलो ६० ते ७० रुपये बाजार भाव मिळत आहे.
शेतीमध्ये दोडका पिकाचा तयार केलेल्या कृत्रिम मंडपामुळे अनेक शेतकरी जेधे यांचे पीक पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत.
मे महिन्यामध्ये दोडक्याचे बी टोपण करण्यात आले. एक महिन्यानंतर दोडक्याची वाढलेली वेल तार व काठीच्या साह्याने बांधण्यात आली. शेतामध्ये कृत्रिम मंडप तयार करण्यात आला. बाहेरील जनावरे व वादळ वाऱ्यापासून दोडक्याचे संरक्षण व्हावे म्हणून पिकाच्या कडेने १० हजार रुपये किंमतीची कापडी जाळी लावण्यात आली. मजूर महिलांच्या साह्याने खुरपणी करण्यात आली. आजतागयत १५ तोडे झाले असून तयार केलेला माल क्रेटमध्ये भरला जातो. दौंड व हवेली तालुक्यातील केडगाव, वरवंड ,यवत, राहू, खुटबाव व उरुळी कांचन येथे बाजारामध्ये घाऊक पद्धतीने व्यापारी खरेदी करतात. सध्या प्रत्येक तोड्यामध्ये २० ते २५ क्रेट उत्पादन मिळत आहे. जेधे यांना या कामी चुलते खरेदी विक्री संघाचे संचालक नानासाहेब जेधे, बंधू मनोज जेधे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अशी केली शेतीची मशागत
सुरुवातीस शेणखत टाकले .
नांगरट, रोटावेटर मारत बेड तयार केले
बेसल डोस देत पट्टा पद्धतीने साडेचार फूट अंतरावर सरी काढली.
बोअरवेल मधून पाण्याची सोय करत ठिबकचे पाइप अंथरले
एक किलो दोडक्याच्या बियांचे टोपण केले.
अधूनमधून ठिबक मधून खते व औषधे सोडण्यात आली.
दोडक्याचा उच्चांकी बहार चालू आहे. गेली महिनाभरात एक लाख रुपये उत्पादन मिळाले आहे. बाजार टिकून राहिल्यास अजून दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कमी कष्टामध्ये चांगले व दर्जेदार पीक घेता आल्याचे समाधान आहे.
- मयूर जेधे, दोडका उत्पादक
02658
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.