खुटबावमधून एक टन खाद्यपदार्थ
खुटबाव, ता.३१ : खुटबाव (ता.दौंड) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून एक टन खाद्यपदार्थ मुंबई येथील मराठा बांधवांसाठी रवाना झाले. यामध्ये ५००० चपाती, ३००० बिस्कीट पुडे,३००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, २०० किलो फरसाण, चार पोती भेळ, २५ किलो शेंगदाणा चटणी यांचा समावेश आहे.जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांच्या हस्ते मुंबईकडे रवाना होणाऱ्या दोन पीक अप वाहनाने पूजन करण्यात आले. यावेळी नाना थोरात, संजय थोरात, संतोष थोरात, महेश थोरात, विलास थोरात, शरद शेलार, दीपक थोरात, शिवाजी थोरात, राजेंद्र खैरे, नवनाथ थोरात, भाऊसाहेब थोरात, बळी थोरात, राजेंद्र ढमढेरे, गणेश शितोळे, भुजंग थोरात, दिगांबर थोरात, राजेंद्र थोरात, रामदास गरुड, कुमार थोरात, सोमनाथ थोरात, संदीप थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

