दमदार नेतृत्व
दमदार नेतृत्व
महाराष्ट्राच्या विकासाला निर्णायक दिशा देणाऱ्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या कामकाजाला आमदार ॲड. राहुलदादा कुल यांच्या नेतृत्वाने अभूतपूर्व गती मिळाली आहे. त्यांनी १९ मे २०२५ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून पुणे जिल्ह्यातील दौंडच्या ग्रामीण भागाचा आवाज राज्याच्या विधिमंडळाच्या सर्वोच्च व्यासपीठावर पोहोचवसा. त्याचा दौंडकरांना विशेष अभिमान वाटत आहे.
- ओंकार बाळकृष्ण थोरात,
स्वीय सहाय्यक, आमदार राहुलदादा कुल
सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून आमदार राहुलदादा कुल यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि प्रशासकीय पकडीने समितीच्या कामाची दिशा निश्चित केली. सार्वजनिक उपक्रमांची कार्यक्षमता वाढवणे, प्रकल्पांची निश्चित वेळेत पूर्णता साधणे, आणि सर्व कामकाजात १०० टक्के पारदर्शकता आणणे, हे त्यांचे मुख्य ध्येय राहिले आहे. विधिमंडळाच्या या महत्त्वाच्या समितीमध्ये ६५हून अधिक महामंडळे समाविष्ट आहेत, ज्यांचा राज्याच्या विकासावर थेट परिणाम होतो. आमदार कुल यांनी या महामंडळांच्या कामांना प्राधान्यक्रम ठरवून, उत्कृष्ट नागरिक सेवा हा अंतिम उद्देश साधण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांची पाहणी
आमदार राहुल कुल व समितीच्या सदस्यांनी ‘सिडको’चा महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, रस्ते विकास महामंडळाचा (MSRDC) पुणे-मुंबई मिसिंग लिंक आणि पुणे रिंगरोड यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन सखोल तांत्रिक पाहणी केली. वाहतुकीची जीवनरेखा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या या प्रकल्पांच्या प्रगतीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध उपयोजना देखील सुचविल्या असून, राज्याच्या प्रगतीत अधिक भर घालणारे हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत.
उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या (MIDC) कुरकुंभ व चाकण येथील उद्योगांना भेटी देऊन त्यांनी औद्योगिक विकासाला चालना दिली. स्थानिक उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि औद्योगिक विकासाला अधिक बळ दिले. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण, पायाभूत सुविधा याबाबत देखील त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच जलसंपदा, नगररचना आणि पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेत, नागरिकांना दर्जेदार सेवा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.
सखोल अभ्यास
विधिमंडळातील कामकाज केवळ सभागृहातच नव्हे, तर समित्यांमधूनही प्रभावीपणे चालते, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताशी आमदार कुल यांनी कृतीने सहमती दर्शवली आहे. महालेखा परीक्षक (CAG) अहवालांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर समित्या न्यायालयीन पद्धतीने सखोल अभ्यास करून ठोस शिफारशी सादर करतात. याच धर्तीवर आमदार ॲड. राहुलदादा कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या कामकाजाला वेग दिला आहे. आजपर्यंत समितीच्या सुमारे ३५हून अधिक बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सिडको (CIDCO), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या प्रमुख महामंडळांच्या प्रलंबित विषयांवर साक्ष नोंदवून, त्यांची त्वरित पूर्तता करण्यासाठी आवश्यक निर्देश दिले आहेत.
जनहिताय योजनांचा प्रभावी आढावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांसारख्या नागरिकांना थेट लाभ देणाऱ्या महत्त्वाच्या महामंडळांच्या कामकाजाचाही त्यांनी सखोल आढावा घेतला आहे. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध
करून देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी समितीच्या माध्यमातून प्रशासनाला दिल्या आहेत.
आमदार ॲड. राहुलदादा कुल यांच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आज महाराष्ट्र राज्याच्या विकासाचे हे अत्यंत महत्त्वाचे दालन नव्या उत्साहाने आणि जोमाने कार्यरत आहे. त्यांच्या या दमदार वाटचालीस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

