ग्रामीण भागातील व्यायामशाळा गजबजल्या

ग्रामीण भागातील व्यायामशाळा गजबजल्या

Published on

प्रकाश शेलार ः सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. ३१ : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेकजण संकल्प करतात. त्यामध्ये अभ्यास करणे, व्यसन सोडणे, व्यायाम करणे व पर्यटन करणे या मुख्य संकल्पनांचा समावेश असतो. अलीकडे व्यायाम करणे हा सर्वात मोठा संकल्प झाला आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागामध्ये नवीन वर्षाचा संकल्प म्हणून गावोगावच्या व्यायामशाळा गर्दीने गजबजू लागल्या आहेत.
पुणे ग्रामीणमधील २०३ व्यायामशाळांमध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर १५ हजार युवकांनी व्यायामाचा संकल्प केल्याचे व्यायामशाळांमध्ये मिळालेल्या आकडेवारी वरून समजते. ग्रामीण भागांमध्ये युवकांबरोबरच युवतीही आपल्या स्पेशल बॅच बनवत व्यायामशाळेमध्ये दाखल होत आहेत. याशिवाय प्रौढ वर्गामध्ये ही व्यायामशाळेची क्रेज वाढली आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक युवक व्यायामाचा संकल्प करतात हा दरवर्षीचा अनुभव आहे. ही बाब व्यायामशाळा चालकांनी हेरली आहे. त्यामुळे बहुतांशी व्यायामशाळा चालकांनी आकर्षक ऑफर देत युवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका वर्षासाठी पाच हजारांपासून ते १० हजारापर्यंत वार्षिक पॅकेज देत अनेक युवक, युवती प्रवेश घेत आहेत.

अलीकडे आरोग्य या विषयाकडे अनेक युवक व युवती गांभीर्याने पाहत आहेत. मधुमेह, हृदयरोग व रक्तदाब या तीन आजारावर व्यायाम हा सर्वात मोठा उपाय आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यायामाचा कल दिवसेंदिवस वाढत आहे.
- विशाल लोणकर, व्यायामशाळा प्रशिक्षक

चौफुला येथे असणाऱ्या माझ्या व्यायामशाळेमध्ये वर्षभरासाठी ३०० प्रवेश आहेत. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर संकल्प म्हणून ५० युवक- युवतींनी प्रवेश घेतला आहे. व्यायाम या विषयाकडे अनेकजण सजगतेने पाहत आहेत.
- सोमनाथ मदने, व्यायामशाळा चालक

पूर्वी गावोगावी तालीम असायच्या. आजकाल तालीमची जागा व्यायामशाळांनी घेतली आहे. सकस व संतुलित आहार, नियमित व्यायाम व झोप असल्यास चांगले शरीर बनवता येते, हे ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी सिद्ध केले आहे. नववर्षानिमित्त प्रत्येक व्यायामशाळांमध्ये अनेकजण व्यायामाचा संकल्प करत आहेत ही बाब भूषणावह आहे.
- आदेश नातू, युवक

03203

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com