सोशल मीडियाद्वारे हृदयस्पर्शी कृतज्ञता व्यक्त

सोशल मीडियाद्वारे हृदयस्पर्शी कृतज्ञता व्यक्त

Published on

खुटबाव, ता. २९ : सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी हृदयस्पर्शी संदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार‌ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी पवार यांचा फोटो झळकत होता. यामध्ये अनेक हृदयस्पर्शी संदेशांमुळे कार्यकर्ते व ग्रामस्थ हळहळत होते.
या संदेशांमध्ये अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल होत होता. यामध्ये अजित पवार म्हणतात की, ‘‘मी कामाचा माणूस आहे. जोपर्यंत माझे हात पाय हलत आहेत, तोपर्यंत तुमचं भलं करीन, मी कामाचाच माणूस आहे.’’ याशिवाय काही दिवसांपूर्वी पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेला शेवटचा सल्ला म्हणजे राजकारण लय वंगाळ आहे. कामधंदा करा, निर्व्यसनी राहा, या संदेशाद्वारे कार्यकर्त्यांनी पवार यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त केली. अनेक कार्यकर्त्यांनी पृथ्वीवरील सूर्य जरी सहा वाजता उगवत असला तरी, पहाटे पाच वाजता उठून जनतेची सेवा करणारा राजकारणातील सूर्य आज मावळला आहे, असा संदेश मोबाईल स्टेटसला ठेवला होता, तसेच आयुष्यभर वेळ पाळणाऱ्या अजित दादांची मृत्यूची वेळ मात्र यावेळी निश्चित चुकली‌. याशिवाय आयुष्यभर घड्याळाची वेळ पाळणाऱ्या अजितदादांची अखेरची ओळख हातातील घड्याळानेच करून दिली, असे मोबाईलवर स्टेटस् ठेवत कार्यकर्ते हळहळ व्यक्त करीत होते.
याशिवाय एआय तंत्रज्ञानाच्या आधारे अजितदादांचा २.२० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अजित पवार यांच्या भारदस्त आवाजामध्ये, ‘‘अरे बेट्यांनो, मी तुम्हाला इतक्या लवकर सोडून जात नसतो. मलाबी अजित पवार म्हणतात. पण गड्यांनो नियतीचा खेळ बघा, खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटले, हीच माझी खरी कमाई आहे. आता मी निरोप घेतोय. परंतु, महाराष्ट्र थांबता कामा नये, रडत बसू नका, उठा कामाला लागा,’’ असा संदेश देत पवार यांना श्रद्धांजली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com