भेटायला वेळ दिला नाही, थेट अध्यक्षपदच दिलेले!

भेटायला वेळ दिला नाही,
थेट अध्यक्षपदच दिलेले!
Published on

सन २००२मध्ये केडगाव येथे एका खासगी संगणक केंद्राचे मी संचालक म्हणून काम पाहत होते. यावेळी अजितदादांशी माझी ओळख नव्हती. पुणे पोलीस व एसआरपीएफ दौंड पोलीस यांना संगणकाचे प्रशिक्षण माझ्या केंद्रामार्फत मिळावे म्हणून मी अजितदादांना भेटण्यासाठी गेले. माझी ओळख नसताना दादांनी माझे काम समजून घेतले. तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना फोन केला. दुसऱ्या दिवशी मुंबई येथे मी माझ्या कामाचा कागद भुजबळ साहेबांना दाखवल्यावर दादांच्या शिफारशीमुळे मला संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम मिळाले. दादांमुळे माझ्यासारख्या संगणक प्रशिक्षण चालक महिलेचा राजकारणात प्रवेश झाला. गेली २५ वर्षापासून आजतागायत अखंडपणे चालू आहे. ८ डिसेंबर २००५ रोजी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचा वाढदिवस होता. यावेळी मी अण्णासाहेब पाटील महामंडळाची अध्यक्ष होते. या वाढदिवसानिमित्त मी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष सतीश मामा खोमणे यांच्यासोबत अँबेसिडर कारमध्ये प्रवास करत होते. बारामतीकडे जात असताना रस्त्यामध्ये आमच्या गाडीचा अपघात झाला. अपघात मोठा असल्याने सतीशमामा व मी गंभीर जखमी झालो होतो. संबंधित बातमी तात्काळ अजित दादांना समजली. अपघातानंतर चौथ्या मिनिटाला अजितदादांचा फोन आला. दादांनी आमच्या तब्येतीची चौकशी केली. तत्काळ रुग्णवाहिका पाठवून आम्हाला दवाखान्यात दाखल केले. ‘सतीशमामांना मधुमेह आहे, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या,’ असे सांगितले. दादांच्या तत्परतेमुळे आम्हाला जीवदान मिळाले. सन २०१३मध्ये महानंद डेअरीचा चेअरमन होण्यासाठी मी अजितदादांना भेटायला गेले. त्यावेळी, ‘मला भेटायला वेळ नाही,’ असे म्हणत अजितदादांनी भेट नाकारली. दादांचा स्वभाव मला माहित असल्याने मला वाईट वाटले नाही. दुसऱ्या दिवशी अरुण देवकर यांच्याकडे माझ्या नावाची चिठ्ठी पाठवत मला महानंद डेअरीचे अध्यक्षपद बहाल केले.
- वैशाली नागवडे, माजी अध्यक्ष, महानंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com