घरफोडीत पावणे सात लाखांंचा चोरी

घरफोडीत पावणे सात लाखांंचा चोरी
Published on

खुटबाव, ता. १९ : खोर (ता. दौंड) गावातील डोंबेवाडी येथे एका युवकाच्या घरी‌ चोरांनी केलेल्या घरफोडीमध्ये सहा लाख ७३ हजार रुपयांच्या सोन्याचे वस्तू व रोख रक्कमेची चोरी गेली आहे. ही घटना रविवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, डोंबेवाडी येथील ज्ञानेश्वर बबन डोंबे (वय ३२, व्यवसाय शेती) याचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ते शनिवारी (ता. १४) पहाटे साडेतीनच्या सुमारास आई, वडील, नवविवाहित पत्नीला घेऊन अक्कलकोट व तुळजापूर येथे दर्शनासाठी गेले व पुन्हा रविवारी (ता. १५) रात्री दीड वाजता डोंबे परिवार घरी आल्यानंतर घरासमोर लावलेली वीज बंद अवस्थेत दिसली. घराचे कुलूप व कडी कोयंडे काढण्यात आले होते. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पाहिल्यानंतर डोंबे यांना घरातील सोने व मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या चोरीमध्ये चोरट्यांनी डोंबे यांच्या आई व पत्नीचे सोने चोरले होते. या दागिन्यांमध्ये एक तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, सव्वा ग्रॅम वजनाचा सोन्याचा चोकर, अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे टॉप्स, अडीच ग्रॅम वजनाचे कानातील सुई दोरा साखळी, अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे टॉप्स, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, साडेतीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरांनी लंपास केली. तसेच दोन लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरण्यात आली आहे. घटनेनंतर यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाने घटनेचा मागोवा घेतला. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी पुरावे गोळा केले.

चोरीची घटना पाळत ठेवून
ज्ञानेश्वर डोंबे हे देवदर्शनासाठी बाहेर गेल्याचे चोरट्यांना माहिती होते. तसेच त्यांचे तीन महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे घरामध्ये पत्नी व आईचे सोन्याचे दागिने होते. रात्रीच्या सुमारास घरात कोणी नसल्याची पुरेपूर कल्पना असणाऱ्या जाणकारांनीच सदर चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

03330

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com