कासुर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन

कासुर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन

Published on

खुटबाव, ता. २० : कासुर्डी (ता. दौंड) ग्रामपंचायतीचे विभाजन झाले असून, राजपत्रानुसार नव्याने झालेल्या रचनेमध्ये आता कासुर्डी, कामठवाडी व जावजीबुवावाडी या तीन ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनच्या ग्रामस्थांच्या मागणीला अखेर यश आले.
कासुर्डी गावाची एकूण लोकसंख्या ६५०० आहे. गावाचा भौगोलिक आकार मोठा असल्याने त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीशी संपर्क ठेवणे कठीण असल्याचे कारण देत कासुर्डी ग्रामपंचायतीचे तीन गावांमध्ये विभाजन व्हावे, असा ठराव ३० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ बापू जगताप यांनी मांडला. या ठरावाला तानाजी राजवडे यांनी अनुमोदन दिल्याची माहिती कासुर्डीचे ग्रामसेवक बालाजी सरवदे यांनी दिली. त्यानंतर ग्रामपंचायत वतीने प्रशासनाला आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यात आली. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तीन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी स्नेहल बर्गे यांनी या संदर्भात अध्यादेश काढला आहे. त्यानुसार ३० डिसेंबर २०२५पासून कासुर्डी, कामठवाडी व जावजीबुवावाडी ही स्वतंत्र महसुली गावे अस्तित्वात आली आहेत.नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या तीन गावांमध्ये स्वतंत्र ध्वजावंदन करण्यात आले.

दौंडमध्ये आता ८६ ग्रामपंचायती
दौंड तालुक्यामध्ये एक वर्षापूर्वी ८१ ग्रामपंचायती होत्या. गेल्या वर्षभरामध्ये गार गावाचे विभाजन होऊन गार, नवीन गार व बेटवाडी अशा तीन ग्रामपंचायती झाल्या. तसेच, हिंगणीबेर्डी ग्रामपंचायतीच्या हिंगणीबेर्डी व काळेवाडी अशा दोन ग्रामपंचायती झाल्या. तसेच, कासुर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन कासुर्डी, कामठवाडी व जावजीबुवावाडी, अशा तीन ग्रामपंचायती झाल्या. त्यामुळे वर्षभरात पूर्वीच्या ग्रामपंचायतीमध्ये पाच ग्रामपंचायतीची नव्याने भर पडल्याने तालुक्यात एकूण ८६ ग्रामपंचायत झालेल्या आहेत, अशी माहिती विस्तार अधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com