पारगाव येथे पारंपरिक मिरवणूक
खुटबाव, ता. २० : पारगाव (ता. दौंड) येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात पारंपरिक वाद्याच्या निनादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला महिलांचा सहभाग विशेष होता.
शिवजयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) पहाटे किल्ले पुरंदरे येथून शिवज्योत आणण्यात आली. त्यानंतर पारगाव सोसायटी समोरील शिवरायांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला. तसेच, यावेळी मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सायंकाळी मिरवणुकीपूर्वी मुख्य रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. या मिरवणुकीमध्ये नादब्रह्म ढोल पथकातील १०० युवक- युवतींनी आपली कला सादर केली. त्यानंतर मुख्य चौकामध्ये शिवरायांच्या जन्माचा पाळणा महिलांनी गायला. त्यानंतर सामूहिक शिवाजी महाराजांची आरती झाली. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या चिमुकल्यांचा उत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. रात्री अभिनेते सागर शेलार दिग्दर्शित अफजलखानाचा वध हे लोकनाट्य सादर करण्यात आले. या नाटकामध्ये गावातील स्थानिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
03342
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

