हडपसर-यवत सहापदरी उडाणपुलासाठी ५,२६२ कोटींची तरतूद
खुटबाव, ता. ६ : हडपसर-यवत सहा पदरी उड्डाणपुलासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५,२६२ कोटींची तरतूद झाल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पात निधी मंजुरीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली आहे. या निर्णयाचे दौंड तालुक्यातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
पुणे शहरातून दौंड तालुक्यात प्रवेश करण्यासाठी हडपसर-यवत हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे या मार्गावर तासनतास वाहतूक कोंडी होत असते. प्रस्तावित सहा पदरी उड्डाणपुलामुळे पुणेकरांना आणि दौंडमधील नागरिकांना विनाअडथळा आणि जलदगतीने प्रवास करता येणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे यवत, केडगाव, भांडगाव, खोर, वरवंड आणि पाटस या भागांमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा वाढणार आहे. पुण्याच्या विस्तारणाऱ्या सीमांमुळे या परिसरात नवीन कारखाने आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, महामार्गालगत वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्राचा मोठा विकास होईल, कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांसाठी विकासकांचे लक्ष या भागाकडे वेधले जाईल. याशिवाय दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील खोर, भांडगाव, वासुंदे, जिरेगाव या जिरायती पट्ट्याला आगामी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. महामार्ग, उड्डाणपूल आणि नियोजित विमानतळ या तिन्ही गोष्टींमुळे या परिसराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, हा प्रकल्प दौंडसाठी महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. आमदार कुल म्हणाले की,"गेल्या वर्षभरापासून या सहा पदरी उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आजच्या अर्थसंकल्पात ५,२६२ कोटी रुपयांची तरतूद झाल्याने पुण्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. दौंडच्या जनतेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो".
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

