भांडगावात रंगला चितपट कुस्त्यांचा थरार

भांडगावात रंगला चितपट कुस्त्यांचा थरार

Published on

खुटबाव, ता. १६ : भांडगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत रोकडोबानाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात तब्बल ७७ चितपट कुस्त्यांचा थरार कुस्ती शौकिनांनी अनुभवला.
यावेळी शेवटची कुस्ती दिल्ली येथील पहिलवान बंटी कुमार सिंग व मंचर (ता. आंबेगाव) येथील पहिलवान दीपक सदावर्ते यांच्यामध्ये एक लाख ११ हजार रुपये इनामावर झाली. शेवटची कुस्ती असल्याने ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. शेवटच्या टप्प्यात हरियाणा येथील संदीप कुमार विरुद्ध पंजाब येथील विक्रम महाले (५१ हजार रुपये इनाम), सदाशिवनगर येथील नाथा चौगुले विरुद्ध इंदापूर येथील संभाजी साळुंखे (३१ हजार रुपये इनाम), पारगाव येथील सुरेश शिंदे विरुद्ध पुणे येथील किरण जाधव (२१ हजार रुपये इनाम), काष्टी येथील अशोक पालवे विरुद्ध शिरूर येथील किरण पवार (११ हजार रुपये इनाम) या पाच लक्षवेधी कुस्त्या झाल्या. पंच म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, अप्पा दोरगे, अमित दोरगे, नितीन दोरगे यांनी काम पाहिले. समालोचन रवींद्र दोरगे व प्रमोद दोरगे यांनी केले.
यावेळी बाळासाहेब दोरगे, महादेव दोरगे, संतोष दोरगे, लक्ष्मण दोरगे, श्याम कापरे, विजय दोरगे, रवी जाधव, संदीप दोरगे, राहुल खळदकर, अण्णा भंडलकर, विलास दोरगे आदी उपस्थित होते.
यात्रेनिमित्त शुक्रवारी (ता. १३) सकाळी रोकडोबानाथांचा अभिषेक झाला. त्यानंतर दुपारी देवाला पोशाख परिधान करण्यात आला. रात्री ९ वाजता छबिना निघाला. यावेळी ग्रामस्थांनी ढोल लेझीम लोककला सादर केले. रात्री १० वाजता मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा झाला. शनिवारी (ता. १४) सकाळी तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कुस्तीच्या आखाड्याने यात्रेची सांगता झाली.

03411

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com