

खुटबाव, ता. २६ : पारगाव (ता. दौंड) येथे नवनाथ रसाळ यांच्या राहत्या घराला जोडून असणाऱ्या गोदामाला आग लागल्याने एक कोटी रुपये किमतीच्या विद्युत उपकरणांच्या दुकानातील जीवनावश्यक वस्तूंचा कोळसा झाला. ही घटना बुधवारी (ता.२५) मध्यरात्री १२.०० वाजण्याच्या सुमारास घडली.
मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेले रसाळ कुटुंब वेळीच जागे झाल्याने जीवितहानी टळली. आगीमध्ये रसाळ यांचा मुलगा आर्यन याला भाजल्याने किरकोळ दुखापत झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागताच फोनवरून रसाळ यांनी ग्रामस्थांना बोलून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला बोलावून घेतले. दोन तासांनंतर कुरकुंभ, दौंड व वाघोली येथील अग्निशमन दल दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा अक्षरशः कोळसा झाला. यामध्ये ६००० चौरस फूट आकाराच्या गोदामातील कपाट, पंखे, पाण्याचे जार, कुलर, बादल्या, पिठाच्या गिरणी, घमेली आदींचा समावेश आहे.
दरम्यान, घटनेनंतर गुरुवार (ता. २६) महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, १५ वर्षांपूर्वी पारगावमध्ये दाखल झालेल्या नवनाथ रसाळ यांनी सुरुवातीस कपडे शिवण्याचे काम केले. मिळालेल्या भांडवलातून हळूहळू विद्युत वस्तूंचा व्यवसाय उभारला. आजवर या व्यवसायामध्ये उभारलेल्या सर्व वस्तू या जळितामध्ये खाक झाल्याने पारगाव ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
03444
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.