

खुटबाव, ता. २८ : खामगाव (ता. दौंड) येथे यवत पोलिसांनी शुक्रवारी (ता. २७) रात्री छापा टाकून चार लाख ८७ हजार रुपये किमतीचा आठ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे.
आकाश अशोक मोहिते (वय २३, रा. खामगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, सागर उत्तम चव्हाण याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खामगाव येथील पाण्याच्या टाकीजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांसह अमली पदार्थविरोधी पथकाने तिथे छापा टाकला.
या कारवाईत आठ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. संशयित मोहिते याने हा साठा सागर चव्हाण याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी मोहिते याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार संशयित सागर चव्हाण याचा शोध सुरू असून, पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.