रेपाळे, रायते भैरवनाथ केसरीचे मानकरी

रेपाळे, रायते भैरवनाथ केसरीचे मानकरी
Published on

खुटबाव, ता. १६ : खुटबाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवानिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात चेतन रेपाळे आणि मनीष रायते ‘भैरवनाथ केसरी’चे संयुक्त मानकरी ठरले. ३५ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या लढतीनंतर पंचांनी दोघांना विजेते घोषित करत ६१ हजार रुपये आणि मानाची गदा देऊन गौरविले.
जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात यांच्या नेतृत्वाखाली खुटबावमध्ये प्रथमच भव्य चितपट कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. पाच तास चाललेल्या या आखाड्यात ग्रामस्थांनी ९० चितपट कुस्त्यांचा थरार अनुभवला. अन्य लढतींमध्ये निखिल कदम, अक्षय चव्हाण, पृथ्वीराज खडके आणि समाधान खामगळ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळवला. महेश शितोळे व माऊली भालेराव यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी ग्रामस्थांनी चार लाख रुपयांची इनामे दिली होती.
यात्रेनिमित्त काळभैरवनाथ महायज्ञ, मानाची दंडवते आणि छबिना सोहळा उत्साहात पार पडला. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर आणि अश्विनी पुणेकर सह बाळासाहेब बेल्हेकर यांच्या तमाशा मंडळांच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली.


03480

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com