कुरकुंभ येथील तरुणाला
लोखंडी सळर्ईने मारहाण

कुरकुंभ येथील तरुणाला लोखंडी सळर्ईने मारहाण

कुरकुंभ, ता. १ : येथील तरुणाला लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी सात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, कुरकुंभ येथील तरुण अविनाश श्रीरंग साळुंखे (वय ३६) याला गावातीलच प्रणीत राजेंद्र भागवत याने फोन करून फिरंगाई क्रिकेट मैदान येथे बोलावून घेतले. त्यानंतर प्रणीत राजेंद्र भागवत व सूरज राजू होले, रोहित महादेव होले, ओंकार नाना होले (तिघेही रा. गोपाळवाडी, ता. दौंड) यांच्यासह आणखी तीन जणांनी कोणतेही कारण नसताना अविनाश साळुंखे यास लोखंडी सळईने डोक्यात, पायावर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत अविनाश साळुंखे जखमी झाला असून, त्याच्यावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मारहाण करणाऱ्या तरुणांनी साळुंखे यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व रोख रक्कम, असा ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला. अविनाश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रणीत राजेंद्र भागवत, सूरज राजू होले, रोहित महादेव होले, ओंकार नाना होले व इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com