कुरकुंभमध्ये रमजाननिमित्त विविध कार्यक्रम
कुरकुंभ, ता. १८ : मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिन्याची सुरुवात गुरुवारपासून (ता. १९) होत असल्याची माहिती कुरकुंभ (ता. दौंड) येथील जामा मशिदीचे विश्वस्त रफिकभाई शेख यांनी दिली. इस्लाम धर्मातील हिजरी कालगणनेनुसार रमजान हा नववा महिना असून, तो उपवासाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) पाळून प्रार्थना, सदाचार, दानधर्म, संयम, सहिष्णुता आणि त्याग यांचे पालन करतात. आत्मशुद्धी आणि समाजातील बंधुभाव वाढविण्यासाठी रमजान महिन्याला विशेष महत्त्व आहे. रमजान महिन्यात जामा मशिदीत विशेष नमाज, व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त रफिक शेख, माजी सरपंच आयुबभाई शेख, मशिदीतील सेवेकरी मुबारकभाई शेख यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

