कुरकुंभ परिसरात गॅसची कृत्रिम टंचाई
कुरकुंभ, ता. १४ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, सर्वसामान्यांची मोठी अडवणूक होत आहे. अव्वाच्या सव्वा दराने गॅसची विक्री करणाऱ्या साठेबाजांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन (रिपाइं) कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ नवनाथ गायकवाड यांनी केली आहे.
कुरकुंभ हे औद्योगिक क्षेत्र असल्याने येथे कामगारांची व स्थानिक नागरिकांची मोठी लोकवस्ती आहे. दैनंदिन जीवनासाठी गॅस ही अत्यावश्यक बाब आहे. मात्र, सध्या गॅसची टंचाई असल्याचे सांगून ग्राहकांकडून जादा पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मुळात ही टंचाई नैसर्गिक नसून काळाबाजार करणाऱ्या प्रवृत्तींनी जाणीवपूर्वक निर्माण केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. "युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे भासवून काही अपप्रवृत्ती सर्वसामान्यांचे शोषण करत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने आणि पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन साठेबाजी करणाऱ्यांवर वचक निर्माण करावा," असे नवनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे. या कृत्रिम टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

