इंदापूरमधील गावागावांतून मराठा बांधवांसाठी शिधा
लोणी देवकर, ता. २ ः मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साथ देणाऱ्या मराठा आंदोलक बांधवांसाठी इंदापूर तालुक्यातील गावागावांतून हजारो भाकरी, चपात्या, चटणी, पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स, खाद्यपदार्थ साहित्य, फळे घेऊन टेम्पो, ट्रॅक व पिकअप गाडी मुंबईच्या दिशेने सोमवारी (ता. १) रात्री रवाना झाले.
मुंबईत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांच्या भोजन व्यवस्थेसाठी अगोती नं. १ व २, वरकुटे बुद्रुक येथे ‘एक घास माणुसकीचा, एक हात मदतीचा’ उपक्रमाअंतर्गत सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केल्यानंतर गावातील समाजबांधवांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो लिटर पाणी बाटल्या, भाकरी, चपात्या, चटणी, फरसाण, बिस्कीट पुडे, पेरू आदी जीवनावश्यक साहित्य मालगाड्यांमधून मुंबईला पाठविण्यात आले.
यावेळी गावातून गाड्या निघताना ‘एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी अगोती व वरकुटे बुद्रुक येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
00239
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.