

लोणी काळभोर, ता. ५ : पुणे- सोलापूर महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी दरम्यानची टोल वसुली मार्च २०१९ मध्ये संपून रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाला आहे. मात्र, या २७ किलोमीटरच्या टप्प्यात प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, सेवा रस्त्यावरील कचरा आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
आर्यन टोल रोड कंपनीने १४ वर्षे टोल वसुली केल्यानंतर हा मार्ग शासनाकडे सोपवला. मात्र, अद्यापही या महामार्गावर महिलांसाठी एकही शौचालय उपलब्ध नाही. स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या सेवा रस्त्यावर व्यावसायिक कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.
महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरील लोखंडी जाळ्या चोरीला गेल्या असून, उघड्या पडलेल्या अँगलमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. साईडपट्ट्यांवरील मुरूम उखडल्याने दुचाकीस्वार घसरून जखमी होत आहेत. वाढते बांधकाम प्रकल्प आणि मंगल कार्यालयांमुळे वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर बनली आहे. या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष बोपलवार यांच्याशी संंपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
02821
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.