लोणी काळभोरमध्ये ४९० लिटर दारू जप्त

लोणी काळभोरमध्ये ४९० लिटर दारू जप्त
Published on

लोणी काळभोर, ता.९ : येथील बाजारमळा परिसरातील मोगले वस्तीत गावठी हातभट्टी दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ४९० लिटर दारूसह ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, मुख्य पुरवठादारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ७) दुपारी दीडच्या सुमारास मोगले वस्तीच्या कॅनॉलजवळ ही कारवाई करण्यात आली. शिवाजी सुभाष फंड (वय २७) आणि सागर प्रकाश काळभोर (वय २८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार अशोक गिरी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
सागर काळभोर याच्या पत्र्याच्या घरात दारू विक्री होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता, दारू विकत घेणारे दोघे पळून गेले. घटनास्थळावरून ३५ लिटरचे ८३ कॅन जप्त करण्यात आले, त्यापैकी १४ कॅनमध्ये ४९० लिटर दारू होती. ही दारू आलताफ अख्तर उर्फ अली (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्याकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com