भरपाईसाठी शेतकऱ्यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

भरपाईसाठी शेतकऱ्यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
Published on

लोणी काळभोर, ता. १२ : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीतील बाधितांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने कदमवाकवस्तीच्या माजी उपसरपंच राजश्री काळभोर यांनी १३ एप्रिलपासून ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अप्पर तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. ग्रामपंचायतीने पंचनामे करून ते महसूल विभागाकडे सोपवले होते. मात्र, जाहीर झालेल्या यादीत अनेक बाधितांची नावे वगळण्यात आली असून काही पंचनामे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यातच आले नाहीत, असा आरोप काळभोर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
पंचनामे वेळेत सादर न करणाऱ्या संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि बाधितांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांच्या वतीने राजश्री काळभोर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com