अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यास कोठडी

अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यास कोठडी
Published on

लोणी काळभोर ता. १२ : प्रेमसंबंधातील वादातून महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करणाऱ्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. १०) रात्री हिंगोली येथून अटक केली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुनील रामप्रसाद मुटकुळे (रा. अकोले, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची २०१७ मध्ये ओळख झाली होती. पुढे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. २०२१ मध्ये पतीशी वाद झाल्यानंतर पीडिता आरोपीसोबत संभाजीनगर येथे राहण्यास गेली होती. या काळात आरोपीने तिचे खासगी फोटो व व्हिडिओ चित्रित केले. फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडिता पुन्हा पतीकडे परतली. याचा राग धरून मुटकुळे याने इन्स्टाग्रामवर ५ ते ६ बनावट खाती उघडून पीडितेचे अश्लील फोटो नातेवाइकांना पाठवून बदनामी केली. अखेर पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून त्याला हिंगोलीतून ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक निरीक्षक अंकुश बोराटे, उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के आणि पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com