नायगाव, कुंजीरवाडी चौकातील दुभाजक कायमस्वरूपी बंद

नायगाव, कुंजीरवाडी चौकातील 
दुभाजक कायमस्वरूपी बंद
Published on

लोणी काळभोर, ता. १५ : पुणे- सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडी चौकातील धोकादायक दुभाजक सोमवारी (ता. १५) कायमस्वरूपी बंद करण्यात आले. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले असून, यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून अपघातांनाही आळा बसणार आहे.
नायगाव आणि कुंजीरवाडी चौकात सकाळी व संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. परिसरातील नर्सरी आणि उद्योगांच्या अवजड वाहनांमुळे या कोंडीत भर पडत होती. ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक नागरिक सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार हे दोन्ही दुभाजक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बदलांनुसार, कुंजीर लॉन्स, मोरया वन सोसायटी आणि जुन्या भारत बेंझ शोरूमसमोर नवीन सुरक्षित ‘यू-टर्न’ तयार केले जाणार आहेत. वाहनांना वळण घेण्यासाठी येथे पुरेसा रस्ता उपलब्ध असेल, ज्यामुळे वेगही कायम राखता येईल. वाहतूक उपायुक्त हिंमत जाधव व पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झाले आहे. या नव्या नियोजनामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com