अपघातानंतर चालकाला दोघांकडून बेदम मारहाण

अपघातानंतर चालकाला
दोघांकडून बेदम मारहाण
Published on

लोणी काळभोर, ता. १८ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे पुणे- सोलापूर महामार्गावर किरकोळ अपघातानंतर चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, याप्रकरणी अमित हनुमंत खंडाळे (वय ३१, रा. जिरेगाव, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खंडाळे हे चालक असून, खराडी येथील समांतर फाउंडेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते खराडी येथील काम करून आपल्या हुंडाई वेन्यू मोटारीने (क्र. एम.एच. ४२ ए.एक्स. ८७६४) जिरेगावकडे निघाले होते. पुणे- सोलापूर महामार्गावरून रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील एसबीआय बँकेसमोरील दुभाजकाजवळ आले. त्यावेळी निळ्या रंगाच्या टाटा टियागो मोटारीच्या (क्र. एम.एच. १२ डब्ल्यू.ई. १५४८) चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून खंडाळे यांच्या मोटारीच्या चाल बाजूला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या मोटारीच्या दरवाजाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर खंडाळे यांनी तत्काळ आपली मोटार रस्त्याच्या कडेला उभी केली. परंतु, समोरील वाहन चालक आणि त्याच्यासोबत असलेला अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि दोघांनीही हाताने बेदम मारहाण केली.
या घटनेदरम्यान खंडाळे यांनी पोलीस आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी फोन करून माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्याचे लक्षात येताच दोघांनी तत्काळ पळ काढला. यानंतर खंडाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञात चालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक सक्रिय केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com