व्हिजन मावळ : भविष्याकडे वाटचाल

व्हिजन मावळ : भविष्याकडे वाटचाल

Published on

पर्यटननगरीचे
नवे हरित ‘व्हीजन’

‘व्हीजन मावळ’ ही केवळ संकल्पना नसून, एक चळवळ आहे. ‘निसर्ग, पर्यावरण राखत विकास’ या तत्त्वावर आधारित या उपक्रमात स्थानिक नागरिक, ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणा, उद्योग, स्वयंसेवी संस्था आणि युवक वर्ग यांच्या सहभागाने मावळचा सर्वांगीण विकास साधता येईल. भविष्यात मावळ हा स्मार्ट, स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक पर्यटन तालुका म्हणून ओळखला जावा, हीच या व्हिजनची खरी दिशा आहे. मावळचा विकास हा केवळ इमारतींचा नव्हे, तर विचारांचा विकास असावा, निसर्ग, संस्कृती आणि समाज यांची सांगड घालणारा असावा ही अपेक्षा.
- भाऊ म्हाळसकर, लोणावळा

मा वळ तालुका हा निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि विकास यांचा सुंदर संगम आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा प्रदेश हिरवाईने नटलेला, निसर्गरम्य डोंगरदऱ्या, धरणे, किल्ले, आणि सांस्कृतिक वारसा यामुळे ओळखला जातो. आज व्हीजन मावळ’ या संकल्पनेद्वारे पर्यटन, सामाजिक विकास आणि नवनवीन प्रकल्पांच्या माध्यमातून मावळचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवले जात आहे.

पर्यटन विकास
मावळ हा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला असून, येथे निसर्गाने भरभरून दान दिले आहे. येथील निसर्ग संपदा, भुशी धरण, तुंग-तिकोना किल्ले, लोणावळा-खंडाळा घाट, भंडारा डोंगर, पवना धरण, विसापूर, लोहगड, कार्ला-भाजे लेणी ही ठिकाणे देशभरातून पर्यटकांना आकर्षित करतात.

व्हीजन मावळ
- इको-टुरिझम झोन विकसित करून स्थानिकांना रोजगार ः हेरिटेज सर्किट- लोणावळा, तुंग-तिकोना, लोहगड-विसापूर, कार्ला, भाजे, पवना यांचा एकत्रित पर्यटन मार्ग
- होमस्टे आणि ग्रामीण पर्यटन प्रोत्साहन- स्थानिक शेतकरी, स्त्रिया आणि युवकांसाठी उत्पन्नाचे साधन
- स्मार्ट टुरिस्ट सेंटर, डिजिटल माहिती फलक, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेचा दर्जा उंचावणे

२. सामाजिक विकास
सामाजिक विकासाशिवाय पर्यटनाचा विकास अपूर्ण आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढविणे हे व्हीजन मावळचे प्रमुख ध्येय आहे.

महत्त्वाचे उपक्रम
- ग्रामीण शाळांचे डिजिटल रूपांतर, संगणक शिक्षण व कौशल्य विकास केंद्र
- आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण, मोबाईल आरोग्य सेवा आणि महिला आरोग्य जनजागृती
- स्वयं साहाय्य गटांचे बळकटीकरण, महिलांना सूक्ष्म वित्त, हस्तकला आणि पर्यटनाशी जोडणे
- युवा प्रशिक्षण केंद्र – पर्यटन मार्गदर्शक, पर्यावरण संवर्धन व सेवा क्षेत्रातील प्रशिक्षण

नवनवीन प्रकल्प
मावळचा विकास शाश्वत पद्धतीने व्हावा, यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रकल्पांची अंमलबजावणी आवश्यक आहे.

प्रस्तावित नवनवीन प्रकल्प
ग्रीन एनर्जी प्रकल्प ः सौर ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पांद्वारे स्थानिक ऊर्जा निर्मिती
वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प ः पर्यटन स्थळांवरील घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक यंत्रणा
डिजिटल मावळ - ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन ग्रामसेवा, स्मार्ट ग्राम योजना
पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणे - रस्ते, पिण्याचे पाणी, शाश्वत वाहतूक सुविधा

पर्यावरण संवर्धन
पर्यावरण हा विकासाचा पाया आहे. पर्यटन आणि औद्योगिकीकरण
वाढताना निसर्गाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. वृक्षारोपण
मोहीम, जलसंधारण प्रकल्प, तळे, ओढे, नदी संवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे जतन आणि वन्यजीव संरक्षण हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

निसर्ग, पर्यटन आणि विकास यांचा समतोल साधत लोणावळ्याचे आधुनिक, सुरक्षित व समृद्ध पर्यटन स्मार्ट आणि शाश्वत विकास यावरच लोणावळ्याचे भवितव्य ठरणार आहे. प्रस्तावित लोणावळा स्कायवॉक, व्ह्यू पॉईंट्सचे आधुनिकीकरण, डिजिटल टुरिस्ट गाइड अॅप, ई-तिकिटींग हा नवीन प्रयोग यशस्वी ठरू शकतो.
विकासाबरोबर तळे, धबधबे, डोंगर उतार यांचे संरक्षण, हिरवाई वाढविण्यासाठी वर्षभर स्वच्छ लोणावळ्यासाठी क्लीन-लोणावळा मिशन, प्लास्टिक-फ्री पर्यटन झोन निर्माण व्हावेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ व अपग्रेड एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्यास प्रवास वेळ व प्रवासातील गुंतागुंत कमी होणार आहे. त्याचा परिणाम लोणावळा-खंडाळा, पुणे-मुंबई दरम्यान वेगवान, सुरक्षित वाहतुकीत होणार आहे.

काचेचा स्कायवॉक ठरणार मैलाचा दगड
लोणावळ्यात टायगर पॉइंट आणि लायन पॉइंटजवळ एक मोठा काचेचा स्कायवॉक प्रकल्प उभारण्यात येत आहे, ज्यामुळे लोणावळ्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. साडेतीनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प पर्यटन क्षेत्रात मैलाचा दगड ठरण्याची चिन्हे आहेत. सध्या हा प्रकल्प विविध परवानग्यांच्या कचाट्यात असून, लवकरच या प्रकल्पाला जालना मिळण्याची शक्यता आहे. सुमारे दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा अनुभव, साहसी खेळ आणि इतर सुविधांची उभारणी या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. लोणावळा पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळत पर्यटन विकासातील महत्त्वाचा अध्याय या प्रकल्पाच्या माध्यमातून लिहिला जाईल.
LON25B04921, LON25B04922

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com