आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील गावांसाठी निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील गावांसाठी निधी
आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील गावांसाठी निधी

आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील गावांसाठी निधी

sakal_logo
By

मंचर, ता. १० : "आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील १२ गावांसाठी ४६ कोटी ५९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. हा निधी पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन २०२२-२३ नवीन नळपाणी योजना राबवण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे.
पिण्याच्या पाण्याची बारा महिने व्यवस्था व्हावी अशी मागणी अनेक गावचे सरपंच व ग्रामस्थांनी वळसे पाटील यांच्याकडे केली होती. लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पाटील यांनी दिली.

योजना मंजूर झालेल्या गावांची नावे व रक्कम पुढील प्रमाणे: आंबेगाव तालुका: धामणी (४ कोटी ९९ लाख ५७ हजार रुपये), निगडाळे ४ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये), चिंचोली (४ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपये), चांडोली बुद्रूक (४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये), चास (४ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये), तळेकर वाडी (४६ लाख ९९ हजार रुपये), साल (३ कोटी ९ लाख ४२ हजार रुपये), घोडेगाव (४ कोटी ९९ लाख ७६ हजार रुपये).

शिरूर तालुका: पिंपळे खालसा (४ कोटी ३३ लाख रुपये), फाकटे (४ कोटी ८१ लाख ६५ हजार रुपये), रावडेवाडी (३ कोटी २९ लाख ८ हजार रुपये), बुरुंजवाडी (२ कोटी ८१ लाख ७७ हजार रुपये).