जुन्नर उपविभागीय बाजार समिती सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रुकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर उपविभागीय बाजार समिती 
सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रुकारी
जुन्नर उपविभागीय बाजार समिती सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रुकारी

जुन्नर उपविभागीय बाजार समिती सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रुकारी

sakal_logo
By

मंचर, ता. २१ : जुन्नर उपविभागीय बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चेतन रुकारी (जुन्नर) व उपाध्यक्षपदी दत्तात्रेय धुमाळ (मंचर) यांची बिनविरोध निवड झाली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे पतसंस्थेच्या मुख्यालयात निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आंबेगाव तालुक्याचे सहायक निबंधक (सहकार) पी. एस. रोकडे यांच्या उपस्थितीत झाली. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर व मावळ तालुका कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीतील सेवक पतसंस्थेचे सभासद आहेत. सन २०२२-२३ ते २०२७ पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकही बिनविरोध झाली आहे.
निवड झालेल्या संचालकांची नावे : दीपक मस्करे, रवींद्र लवांडे, सागर लाखे, संतोष थिगळे, संजय शिंदे, गणेश गावडे, प्रशांत टकले, महेश सातपुते, नीलेश अत्रे, ज्ञानेश्वर आडकर, पूजा फुलपगार, निर्मला शिंगाडे.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जुन्नर बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे, मंचर बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे, वडगाव मावळ बाजार समितीचे सचिव मंगेश घारे यांनी प्रयत्न केले. नवनिर्वाचित अध्यक्ष रुकारी व उपाध्यक्ष धुमाळ यांचा सत्कार मावळते अध्यक्ष श्‍यामराव बारणे व माजी संचालक शरद घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आला.
रुकारी म्हणाले, ‘‘३६ वर्षांपूर्वी सेवक पतसंस्थेची स्थापना झाली आहे. पाच कोटी रुपये अधिकृत भागभांडवल आहे. सन २०२१-२२ मध्ये २२ लाख ७६ हजार ५८१ रुपये नफा झाला आहे. ऑडिट वर्ग ‘अ’ आहे.”