एकलहरेतील महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकलहरेतील महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठापना
एकलहरेतील महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठापना

एकलहरेतील महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठापना

sakal_logo
By

मंचर, ता.२१ : एकलहरे (ता.आंबेगाव) येथील शिंदेवाडीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त लोकवर्गणीतून उभारलेल्या महादेव मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या कलशारोहण मिरवणुकीला भाविकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी अग्रभागी कलशधारी महिला व हनुमान भजनी मंडळ होते.
मूर्तीला रुद्राभिषेक, वास्तुशांती, रुद्रयान व होम हवन करण्यात आले. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा शेवाळवाडी-अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीचे महंत मिरचीनाथबाबा खडेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच नवनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे, दत्तात्रेय महाराज शिंदे, बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
महाळुंगे पडवळ येथील नवनाथ आवटे यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम झाला. भाविकांना अन्नप्रसादाची व्यवस्था शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
07551