अवसरीत घनकचरा व सांडपाणी प्रकल्पाचे भूमिपूजन

अवसरीत घनकचरा व सांडपाणी प्रकल्पाचे भूमिपूजन

मंचर, ता.२३ : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (ता.२३) आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे व सरपंच कमलेश शिंदे यांच्या हस्ते झाला.
आंबेगाव तालुक्यात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत २६ गावांमध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांचे उद्‌घाटन पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व हस्तांतरण करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मिलिंद टोणपे, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अवसरी खुर्द, जवळे, पिंपळगाव खडकी, कारेगाव, थुगाव आदी २६ गावांत कार्यक्रम झाले.
अवसरी खुर्द ग्रामपंचायतीच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे तज्ञ काळूराम डांगले, ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे सांडपाणी व्यवस्थापन तज्ञ प्रवीण खंडागळे, धोंडिभाऊ महाराज शिंदे सदस्या सुवर्णा क्षीरसागर, प्रवीण भोर, वैभव वायाळ, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास भोर, दिनेश खेडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी डांगले म्हणाले “प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांवर भर द्यावा. जनजागृती करावी.” खंडागळे यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनबाबत माहिती दिली. राजू वायकर, महेश पोळ यांनी व्यवस्था पाहिली. स्नेहा टेमकर यांनी स्वागत केले. विजया राजू भोर यांनी आभार मानले.

........................
07570

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com