मंचरमधील खूनप्रकरणातील आरोपी २४ तासात अटक

मंचरमधील खूनप्रकरणातील आरोपी २४ तासात अटक
Published on

मंचर, ता १८ : येथील पुणे ग्रामीण पोलिस खात्यातील सेवानिवृत्त पोलिस अंमलदार पंढरीनाथ थोरात यांचा पैशाच्या व्यवहारातून खून झाल्याचे मंचर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून आढळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २४ तासात या गुन्हाचा छडा लावला आहे. मच्छिंद्र पांडू गुंजाळ, (वय ५५, रा. मुळेवाडी रस्ता, मंचर, ता. आंबेगाव) याला अटक केली आहे. घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. के. शेख यांनी आरोपीला गुरुवार (ता.२२) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घटटे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी या प्रकरणी लक्ष देऊन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर व सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांना गुन्ह्याविषयी मार्गदर्शनानुसार पोलिस तपास पथकातील संजय नाडेकर, सुदर्शन माताडे, योगेश रोडे, अजित पवार, संदीप रावते यांनी तपासासाठी मोबाईल लोकेशन व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांनतर आरोपी गुंजाळला ताब्यात घेतल्यानंतर सुरवातीला तो काहीच बोलत नव्हता. प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर आरोपीने खुनाची कबुली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.