राज्यातील गट, समूह समन्वयकांच्या मानधनात वाढ

राज्यातील गट, समूह समन्वयकांच्या मानधनात वाढ

मंचर, ता. १० : ‘महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी पुरवठा व स्वच्छता) अंतर्गत कार्यरत असलेले गट समन्वयक व समूह
समन्वयकांना मानधनात दहा टक्के वाढ देण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील व प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी नुकताच घेतला आहे. याबाबत राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या प्रकल्प संचालिका सुषमा सातपुते यांनी आदेश पारित केले आहेत. त्यानुसार राज्यात कार्यरत असलेले गट समन्वयक व समूह समन्वयकांना
दरमहा २५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचा लाभ राज्यात ४८५ कर्मचाऱ्यांना होणार आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास निकम यांनी दिली.

‘कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा मंजूर करावी, अपघात विमा लागू करावा, रिक्त असलेले पदे त्वरित भरावीत, आदी मागण्यांबाबत राज्य शासनाकडे संघटनेने पत्रव्यवहार केला होता, अनेकदा आंदोलने केली होती. त्यानुसार सध्यस्थितीत राज्यात कार्यरत असलेले गट समन्वयक व समूह समन्वयक या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १ एप्रिल २०२३ पासून उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून २५ हजार रुपये रक्कम देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सध्यस्थीतीत राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव अभियान, जलजीवन मिशनअंतर्गत शुद्ध पाणी मिळण्यासाठी जनजागृती करणे अशा विविध अभियानांची प्रभावी अंमलबजावणी या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. तब्बल बारा वर्षांच्या लढ्यानंतर यश आले,’ असे राज्य संघटनेचे सचिव जयंत वर्मा व आंबेगाव तालुक्यातील संघटनेचे प्रमुख पंकज चौधरी यांनी सांगितले.
............................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com