शेतकऱ्यांच्या खात्यावर 
जमा होणार अनुदान

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अनुदान

Published on

मंचर, ता. २६ : “मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या चार हजार ८७१ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचे १५ कोटी ९८ लाख ११ हजार ५४३ रुपये अनुदान देण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनुदान रक्कम १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. याकामी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाठपुरावा केला होता,” अशी माहिती मंचर बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव व उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

उन्हाळी पीक नोंद असलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळण्यासाठी नियम व अटी अडचणीच्या ठरत होत्या. त्यामुळे आंबेगाव, शिरूर, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. गेल्या आठवड्यात भालेराव व पानसरे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान योजनेचा लाभ मिळण्याची मागणी केली होती. वळसे पाटील यांनी पणन संचालकांना याबाबत कार्यवाही करण्याविषयी सूचित केले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.