मंचरला तपनेश्‍वर मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

मंचरला तपनेश्‍वर मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

मंचर, ता.२१ : मंचर (ता. आंबेगाव) येथील तपनेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी (ता.२१) भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली होती. वीस हजार भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
श्री श्रेत्र भीमाशंकरकडे जाणारे भाविक आवर्जून तपनेश्वर मंदिरातील ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, गणपतराव क्षीरसागर, पंडित माशेरे, अजित बेंडे, सुनील पोखरकर, अविनाश शेटे यांच्या हस्ते तपनेश्वर मंदिरात पहाटे मानाचा अभिषेक करण्यात आला. संतोष त्रिवेदी व शिवप्रसाद राजगुरू यांनी पौराहित्य केले. वीस हजारहून अधिक भाविकांना खिचडी, खजूर, केळी व चहाचे वाटप करण्यात आले. अशी माहिती अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत ऊर्फ बाबा धायबर यांनी दिली. ते म्हणाले" गेल्या २८ वर्षापासून श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविकांना मोफत फराळ वाटप केले जाते".

08829

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com