दशक्रिया विधीवेळी नेत्यांतर्फे श्रद्धांजली वाहण्यास बंदी

दशक्रिया विधीवेळी नेत्यांतर्फे श्रद्धांजली वाहण्यास बंदी

Published on

मंचर, ता. ३ : दशक्रिया विधी अत्यंत दुख:द प्रसंग आहे. या प्रसंगी आपल्या बोलण्याने वादंग आणि विनोद होणार नाही, याची काळजी घ्या. त्यासाठी दोन मिनिटातच भावना व्यक्त करा. तर नेत्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी बंदी घातल्याच्या सूचना आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील गावकऱ्यांनी दशक्रिया विधीप्रसंगी जाहीर केल्या.
पुणे जिल्ह्यात विशेषतः आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ या तालुक्यात दशक्रिया विधीला मोठा जनसमुदाय जमा होतो. या संधीचा फायदा जवळपास सर्वच राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते घेतात. मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गेल्या महिन्यात एका दशक्रिया विधीत तर आरोप, प्रत्यारोप आणि टोमणे मारून विनोदी संमेलनाचे स्वरूप देण्यात आले होते. हा सर्व प्रकार पाहून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अस्वस्थ झाले. मध्येच त्यांनी माईक हातात घेतला. ते म्हणाले ‘‘हा दुख:द प्रसंग आहे राजकीय व्यासपीठ नाही. येथे फक्त सांत्वनपर बोलावे. टोमणे मारून विनोद करू नका हे काही विनोदी संमेलन नाही याचे भान बोलणाऱ्यांनी ठेवावे.’’
गावडेवाडी येथे नुकतेच तीन दशक्रिया विधी एकत्रित झाल्या. त्यामुळे विविध ठिकाणचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने आले होते. या वेळी अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते श्रद्धांजली व्यक्त करण्याच्या तयारीत होते. या वेळी श्रद्धांजली दोन मिनिटात व्यक्त करा. टीका, टोमणे आणि विनोद करू नका. कोणत्याही नेत्याच्या वतीने श्रद्धांजली वाहू नका. अशा सूचना माजी सरपंच देवराम गावडे, राजू शिंदे, सरपंच विजय गावडे आणि ऋषिकेश गावडे यांनी केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.