विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या : घोलप

विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या : घोलप

मंचर, ता.६ : “अन्नधान्य, संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके व तण नाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा विनाश झाल्याने जमिनी मृतवत होत चालल्या आहेत. हे रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीसाठी कृषी खात्यामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,” असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप यांनी केले.
पोखरी (ता.आंबेगाव) येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत सेंद्रिय गटांचा गाव स्तरीय झालेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात घोलप बोलत होते.

नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे मृदा विषय तज्ज्ञ योगेश यादव यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मंडल कृषी अधिकारी रामचंद्र बारवे, सरपंच हनुमंत बेंढारी, उपसरपंच, कृषी पर्यवेक्षक डामसे, प्रकाश आंबेकर, कृषी सहायक आर.के विरणक, अरविंद मोहरे, ज्ञानेश्वर लोहकरे उपस्थित होते.
आत्मा समन्वयक धोंडिभाऊ पाबळे यांनी प्रास्ताविक व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब बेंढारी यांनी आभार केले.

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी कडक होत आहेत. त्यामुळे मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. रासायनिक निविष्ठांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
- योगेश यादव, मृदा विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

आंबेगाव तालुक्यात नैसर्गिक शेतीचा ५०० हेक्टरचा क्लस्टर व परंपरागत कृषिविकास योजनेअंतर्गत ३०० हेक्टरचा क्लस्टर तयार केला आहे. ८२९ शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. ते नाचणी, हिरडा, भात ही पिके उत्पादित करणार आहेत. त्यांची शेतकरी कंपनी स्थापन करून वर्गवारी, प्रतवारी, पँकिंग व बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- नरेंद्र वेताळ, कृषी अधिकारी (ता.आंबेगाव)

09843

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com