आंबेगाव तालुक्यात बाजरीचे पीक जमीनदोस्त

आंबेगाव तालुक्यात बाजरीचे पीक जमीनदोस्त

मंचर, ता. १० : आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी (ता. १०) दुपारनंतर मंचर, अवसरी खुर्द, आदर्शगाव गावडेवाडी, पिंपळगाव या भागात वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण काही ठिकाणी बाजरी पीक जमीन दोस्त झाली असून गाईंच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
गेली आठ-दहा दिवस दिवसेंदिवस तापमान वाढत होते. त्यामुळे विशेषतः दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रचंड उकाड्यामुळे नागरिक, लहान मुले व महिला घराबाहेर पडत नव्हत्या. शुक्रवारी सकाळपासूनच आकाशात ढग जमू लागले होते. त्यामुळे पाऊस पडेल असा अंदाज होता. दुपारनंतर सुरुवातीला वादळ व त्यानंतर पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे कोसळली असून विशेषतः मका व बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे.
अवसरी खुर्द येथील बाळासाहेब बाबूराव टेमकर यांच्या गुरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले आहेत. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. टेमकर कुटुंबाचे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच भीमाशंकर दगडू शिंदे यांचे ऐन भरात आलेले बाजरी पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा स्वरूपाच्या घटना गावडेवाडी, मंचर, खडकी, पिंपळगाव आदी ठिकाणी घडल्या आहेत.

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) : वादळी पावसामुळे बाजरी पीक जमीनदोस्त झाले. (दुसऱ्या छायाचित्रात) गुरांच्या गोठ्यांचे पत्रे उडून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com