निवडणूक काळात विविध 
गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई

निवडणूक काळात विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई

मंचर, ता. ११ : “शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्यांतर्गत दुखापत, मारहाण व शरीराला इजा करणाऱ्या ३३१ जणांवर कलम १०७ नूसार व गंभीर गुन्ह्यातील १३ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली,” अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.
फुगे म्हणाले, “पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार, निवडणूक मतदान शांततेत व्हावे, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना मंचर पोलिसांनी हाती घेतल्या आहेत. पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ५० इमारतीमध्ये ९९ मतदान केंद्र आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्या १६ जणांवर तसेच वारंवार दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली. शस्त्र बाळगून गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे व भयमुक्त वातावरणात बजावावा. त्याकरिता सर्व नागरिकांनी मतदान करावे, मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात मोबाईल, फोन व ज्वलनशील पदार्थ नेण्यास सक्त मनाई केली आहे. दोनशे मीटर परिघाबाहेर बुथवर केवळ एक टेबल, दोन खुर्च्या, छत्री, छोटा मंडप लावता येईल, अन्यथा कारवाई करण्यात येईल.”

मतदान केंद्रावर शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी सीआरएसएफचे १०० जवान, २१ पोलिस अधिकारी, ३०६ पोलिस जवान, २५८ होमगार्ड असे एकूण ५६४ पोलिस जवान, होमगार्ड बंदोबस्तावर राहणार आहेत. नागरिकांनी शांततेत मतदान करून पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे.
अरुण फुगे, पोलिस निरीक्षक, मंचर पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com