कॅमेऱ्यात कैद केल्या मतदानाच्या आठवणी

कॅमेऱ्यात कैद केल्या मतदानाच्या आठवणी

मंचर, ता. १३ : शिरूर लोकसभा मतदार संघ अंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदार संघात मंचर, अवसरी खुर्द, घोडेगाव, पेठ, कळंब व शिरूर तालुक्यातील जोडलेल्या ३९ गावात रांजणगाव, कवठे यमाई, साविंदणे, पाबळ, कान्हूर मेसाई, जातेगाव बुद्रुक, टाकळी हाजी आदी सर्वाधिक मतदान असलेल्या गावात सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून येत होता. मतदान झाल्यानंतर मतदारांनी मतदानाच्या आठवणी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सेल्फी काढण्याचाही तरुणाईचा कल होता.
अधिक मतदार संख्या असलेल्या केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त आणि लष्करी जवानही तैनात केले होते. २०० मीटरच्या आत वृद्ध, दिव्यांग व आजारी व्यक्तींना वाहनाने सोडण्यास परवानगी होती पण मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. ओळखपत्राची खात्री केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जात होता. वाड्यावस्त्यावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिला मतदारांची ने-आण करण्याच्या व्यवस्थेसाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. गेली दोन दिवस झालेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर मतदानावर परिणाम होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात होती. पिण्याच्या पाण्याची सर्वत्र सोय होती. सावलीसाठी मंडपही उभारण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी व्हीलचेअर आणि खुर्च्यांची व्यवस्था केली होती. दुपारी बारा ते दोन या वेळेत उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाला लोक कमी येत होते. पण संध्याकाळी तीननंतर मतदारांचा ओघ वाढला.
तांबडेमळा मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांनी व अवसरी बुद्रुक येथील मतदान केंद्र महिला कर्मचाऱ्यांनी समर्थपणे चालविले. दुपारी नारोडी आणि फलकेवाडी येथे ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला होता. दहा मिनिटात तेथे नवीन मशिन देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत केली. सर्वत्र निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com