वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर
ंमंचर पोलिसांकडून कारवाई

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर ंमंचर पोलिसांकडून कारवाई

मंचर, ता. १ : मंचर (ता. आंबेगाव) शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी व चारचाकी, अशा विविध वीसहून अधिक वाहनांवर मंचर पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून कायदेशीर कारवाई केली, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.
मंचर शहरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून सध्या रस्त्याहून ये-जा करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याच्या, बंद सदनिकेतून ऐवज चोरून नेण्याच्या, तसेच मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंचर पोलिसांनी पिंपळगाव फाटा, मुळेवाडी रस्त्यावर दोन पोलिस अधिकारी व दहा अंमलदार यांच्या उपस्थितीत नाकाबंदी केली. वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट बसविणे, काळी काच, विना नंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट वाहतूक करणारे मोटरसायकलधारक, दारू पिऊन गाडी चालवणारे, अशा विविध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नाकाबंदी करून कायदेशीर कारवाई केली.
फुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, सहायक पोलिस उपनिरिक्षक संपत कायगुडे, पोलिस हवालदार विलास साबळे व इतर अंमलदार यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.

नागरिकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन चालवण्यासाठी देऊ नये. तसेच, विनापरवाना वाहने चालवू नयेत, मोटार वाहन कायद्यानुसारच वाहने चालवावीत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळोवेळी नाकाबंदी करून तपासण्या केल्या जातील.
- अरुण फुगे, पोलिस निरीक्षक, मंचर पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com