बिबट्याच्या हल्ल्यात
अवसरीत घोडा ठार

बिबट्याच्या हल्ल्यात अवसरीत घोडा ठार

मंचर, ता. १ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील खालच्या शिंदेमळा येथे शनिवारी (ता. १) पहाटे मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये घोडा ठार झाला.
मेंढपाळ धुळा नामदेव गोरे यांचा मेंढ्यांचा कळप शेतकरी दीपक विठ्ठल शिंदे यांच्या शेतात मुक्कामी थांबला होता. पहाटे सर्वजण गाढ झोपेत बिबट्याने घोड्यावर हल्ला केला. मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक आय. एस. मोमीन यांनी घटनास्थळी भेट देऊन ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला.
दरम्यान, या घटनेमुळे या भागातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com