अमोल कोल्हे यांचा
उद्या जनता दरबार

अमोल कोल्हे यांचा उद्या जनता दरबार

Published on

मंचर, ता. ८ : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा जनता दरबार बुधवारी (ता. १०) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शरद पवार सभागृहात महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित केला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबारात विविध शासकीय विभागाचे विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपले प्रश्न लेखी स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन निकम यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.