

मंचर, ता. ३ : मंचर येथे नवरात्र उत्सवाचे नियोजन सुरू असतानाच बेकायदा गर्दी जमवून तीन जणांना मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. २) रात्री घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी एकूण १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात अभिजित बाळासाहेब गावडे (रा. मंचर) यांनी फिर्याद दिली. त्यात नमूद केलेल्या माहितीनुसार पाटीलवाडा येथे आदिरा फाउंडेशन नवरात्र उत्सव मंडळाच्या ठिकाणी अभिजित गावडे व सोबत ज्ञानेश्वर पवार नियोजन करत होते. तेथे मोटारीमधून स्वप्नील बागल, प्रदीयुग्न फुले, कार्तिक वळसे, बाबू गावडे, अक्षय हांडे आले. त्यानंतर तीन मोटरसायकलवरून किशोर राक्षे, शुभम भानुसे, प्रसाद मोरडे, विकी हांडे व इतर सहा जण (सर्व रा. मंचर- मोरडेवाडी) आले. स्वप्नील बागल याने माझा भाऊ संतोष गावडे व पुतण्या यश गावडे या दोघांची नावे घेऊन ‘आम्ही यश व संतोषला सोडणार नाही.’ असे म्हणून माझ्या नाकावर बुक्का व काठीने दुखापत केली. भाऊ संतोष गावडे व यश यालाही शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.