मध्यस्तांमुळे शेतकऱ्याचा वाटा नगण्य
मंचर, ता.८ : ‘‘कांदा पिकातील अस्थिर बाजारभावामुळे शेतकऱ्याला शाश्वत किंमत मिळत नाही. शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत कांदा व शेतमाल पोहोचेपर्यंत पुरवठा साखळीतील अनेक मध्यस्तांमुळे ग्राहकाने मोजलेल्या रुपयांमध्ये शेतकऱ्याचा वाटा हा नगण्य असतो. ही पुरवठा साखळी कमी करण्यासाठी कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने पुढाकार घेईल,’’ अशी ग्वाही कांदा व लसूण संशोधन संचालनाचे संचालक डॉ. विजय महाजन यांनी सांगितले.
राजगुरुनगर (ता.खेड) येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयामध्ये नुकताच शास्त्रज्ञ, शेतकरी, उत्पादक कंपनी व निर्यातदार यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ. महाजन बोलत होते. शास्त्रज्ञ डॉ. शैलेंद्र गाडगे, शास्त्रज्ञ डॉ.राजीव काळे, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विवेक भोईटे, निर्यातदार हसन शफीक, जुन्नर, आंबेगाव, व नगर जिल्ह्यातील ५० शेतकरी उपस्थित होते.
यावेळी महाजन म्हणाले की, शेतकऱ्यांना शेतमालाला शाश्वत बाजारभाव मिळण्यासाठी निर्यातदार, शेतकरी व उत्पादक कंपनी यांना एकत्रित करून अन्न प्रक्रिया व कांदा निर्यातीसाठी दर्जेदार प्रशिक्षण कांदा व लसूण संशोधन केंद्रात दिले जाईल. त्याचा फायदा कांदा उत्पादकांना होईल.
निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी सुधारित वाण, खत व पाणी व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन तसेच साठवणूक आणि प्रतवारी या विषयांवर शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांकडून प्रक्रियाक्षम व निर्यातक्षम कांदा प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना पूर्व निश्चित दर ठरवून कांदा विक्री व्यवस्थापन शाश्वत केले जाईल.
- डॉ.राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ.
11740
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

