आंबेगाव तालुक्यात दत्तजन्म सोहळ्याची जय्यत तयारी
मंचर, ता. १३ : आंबेगाव तालुक्यात मंचर, अवसरी खुर्द, अवसरी फाटा, लांडेवाडी, पिंपळगाव, वायाळमळा आदी गावात शनिवारी (ता. १४) होणाऱ्या श्रीदत्त जयंती सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यानिमित्त भजन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात श्रीदत्त जयंती उत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू आहे. पारायण सोहळ्याला महिला भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. येथील व्यवस्था शैला महाजन, पूजा मोरे, सविता खरमाळे, गायत्री महाजन, रेणुका श्रीगादी पाहत आहेत. शनिवारी संध्याकाळी दत्त जन्म सोहळा, ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे कीर्तन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

