‘मंचरला अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार’

‘मंचरला अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार’

Published on

मंचर, ता. १८ : ‘‘आंबेगाव तालुक्यात वित्त, पोलिस, वन, कृषी, आयकर, बँक, महसूल, सेल टॅक्स या क्षेत्रात ग्रामीण भागातील युवक युवतींची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय परिसरात अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काम प्रगती पथावर आहे.’’ अशी माहिती शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
मंचर येथे शरद सहकारी बँकेच्या सभागृहात बँकेच्या वतीने काजल इंदोरे (चांडोली खुर्द), ऋषिकेश खालकर (जवळे), पवन खंडागळे (आमोंडी), ओंकार गोरे (निरगुडसर) यांनी सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल व सौरभ थोरात (आमदाबाद ता. शिरूर) यांनी कामगार विभागात शुभम भालेराव (कळंब) यांनी बँक वर्ग १ परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, उद्योजक सचिन भोर, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, अरुणा थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रवीण मोरडे, सचिन बाणखेले, बाजीराव मोरडे, बाळासाहेब बाणखेले, राजेंद्र थोरात, राजेंद्र भंडारी, सुहास बाणखेले, रेवती वाडेकर उपस्थित होते. यावेळी काजल इंदोरे, ऋषिकेश खालकर यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com