बिबट्याने दोन कुत्र्यांचा मंचरमध्ये पाडला फडशा
मंचर, ता. १८ : मंचर (ता. आंबेगाव) शहराच्या हद्दीपासून ५०० मीटर अंतरावर शेवाळवाडी -खटकाळी (तालुका आंबेगाव) येथे बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला. हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकाराने शेवाळवाडी -मंचर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
भिकाजी थोरात यांना मंगळवारी (ता. १४) रात्री कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडून दिवे सुरू केले. उजेड पडताच कुत्र्याला घेऊन बिबट्याने धूम ठोकली. ग. शेवाळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच प्रतिमा संजय थोरात यांचेही कुत्रे बिबट्याने नेले आहे. सलग दोन दिवस बिबट्याने दोन कुत्री नेली आहेत. घटनेची माहिती पाच दिवसांपूर्वी मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाला कळविली आहे. पण वनखात्याने अद्याप पिंजरा लावलेला नाही. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने तातडीने उपाययोजना करून पिंजरा लावावा, अशी मागणी योगेश थोरात यांनी केली आहे. शेवाळवाडी परिसरात डोंगर व टेकड्या आहेत. येथे पूर्ण वाढ झालेला बिबट्या असून, त्याचा रात्री उपद्रव वाढला आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

