भीमाशंकरसाठी 
एसटींची व्यवस्था

भीमाशंकरसाठी एसटींची व्यवस्था

Published on

मंचर, ता. २५ : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बुधवारी (ता.२६) रोजी महाशिवरात्रीनिमित्त यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने एकूण ८६ एसटी गाड्यांची व्यवस्था केली आहे. मंगळवारी (ता.२५) सकाळपासून गुरुवार (ता.२७) रात्री उशिरापर्यंत २४ तास एसटी सेवा भाविकांसाठी उपलब्ध आहे. मंचर बसस्थानक व भीमाशंकर बस स्थानकावर वाहतूक नियंत्रकाच्या नेमणुका केल्या आहेत.” अशी माहिती तांबडेमळा-मंचर आगर प्रमुख बालाजी सूर्यवंशी व मंचर बसस्थानक प्रमुख साधना कालेकर यांनी दिली.
कालेकर म्हणाल्या, ‘‘शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड, बारामती औद्योगिक वसाहत येथून एकूण ८१ एसटी गाड्या व मंचर बस स्थानकाच्या पाच अशा एकूण ८६ एसटी गाड्यांची व्यवस्था केली आहे. एक हजार ७१६ एसटी गाड्यांच्या फेऱ्या करण्याचे नियोजन आहे.त्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळानचे अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत.मंचर व शिवाजीनगर बसस्थानकावारून दर आर्ध्या तासाला भीमाशंकरला जाण्यासाठी एसटी गाड्यांची सोय आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com